Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

कोंडिवरे गावात १० वर्षांपासून पोलीस पाटील पद रिक्त : ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी हैराण

–(जाकीर शेकासन यांजकडून)_

कोंडिवरे गावातील *पोलीस पाटील पद गेली 10 वर्षे रिक्त* आहे. त्यामुळे गावकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

*समस्या काय आहेत?*
1. *कार्यभार दुसऱ्याकडे* – कोंडिवरेचा अतिरिक्त कार्यभार _मुरडव_ येथील पोलीस पाटलांकडे आहे.
2. *दाखल्यासाठी 20 कि.मी. फेरा* – रहिवासी, उत्पन्न, जात दाखल्यांसाठी गावकऱ्यांना १० कि.मी. अंतर कापून मुरडवला जावे लागत आहे. ऐकून २० कि. मी. चा फेरा
3. *शेतकरी-विद्यार्थी त्रस्त* – शेतकऱ्यांना 7/12 वरील नोंदी, पंचनामे आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे दाखले मिळण्यास विलंब होत आहे.
4. *कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न* – रात्री-बेरात्री गावात काही घटना घडल्यास तातडीने दखल घेणारं कोणीच नाही.

*ग्रामस्थांची मागणी*
कोंडिवरे गावातील पोलीस पाटील पद _तातडीने भरावे_ अशी मागणी ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थी वर्गातून होत आहे.

_10 वर्षे झाली तरी पद रिक्त! शासनाने याची तातडीने दखल घ्यावी._

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!