
रत्नागिरीत २६वा कबड्डी दिन उत्साहात साजरा
चक्रभेदी सोशल फौंडेशन देवरुख रत्नागिरीच्या वैदेही सुधीर सावंत यांनी उपस्थिती दर्शविली.
स्वर्गीय बुवा साळवी यांचा जन्मदिन आणि २६ वा कबड्डी दिन यानिमित्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित विशेष कार्यक्रमाचे १५/०७/२०२६रोजी ३ वाजता रत्नागिरीतील देसाई बँक्वेट हॉल, विवेक हॉटेल, माळनाका येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.. त्यात रत्नागिरीतील कृतज्ञता पुरस्कार सदानंद जोशी, उदयोन्मुख पुरस्कार सुरज राठोड, उत्कष्ट पंच म्हणून विलास सावंत यांचा सन्मान केला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा कार्याध्यक्ष गजानन कीर्तीकर, आमदार भाई जगताप, आमदार किरण उर्फ भैय्या सामंत, असोसिएशनचे प्र. सहकार्यवाह माधव गायकवाड, खजिनदार मंगल पांडे, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह नितीन बांद्रे, रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे उपस्थित होत्या…
या प्रसंगी क्रीडा पत्रकार मंगेश वरवडेकर, दै. ‘सकाळ’चे अल्ताफ कडकाले यांना ‘ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार’ प्रदान केला . तसेच कबड्डीच्या विकासासाठी आपले आयुष्य वाहून घेतलेले सांगलीचे दिनकर पाटील आणि पुण्याच्या शकुंतला खटावकर यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवन गौरव पुरस्कार’ देण्यात आला तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते पुरस्कार आत्माराम घेगडे, बंडू कांबळे, भरत मुळे, गिरीश नाईक, डॉ. दत्तात्रय शिंफी, वत्केश राऊत, खंडबाराव नाईक, प्रकाश पाटील, सय्यद अजगर अली पटेल आणि विलास सावंत यांना देण्यात आला.
ज्येष्ठ पंच पुरस्कार प्रथश मोरे, रवींद्र साड, अरुण पवार, अनिल शेजवळ, सूर्यकांत मुटके, वाल्मिक बागुल, मधुकर साळुंखे, हिरामण भोईर, बाळकृष्ण कडूस आणि रामदास गोळे, ज्येष्ठ खेळाडू पुरस्कार सुरेश मोरे, शशिकांत कोरगावकर, रवींद्र लवेकर, तुळसीदास रोकडे, ब्रह्मनाथ मेंगडे, सुदाम जोगदंड, अलका कारखानीस आणि मदन गायकवाड यांना देण्यात येणार आहे. तसेच उदयोन्मुख कबड्डीपटू शिष्यवृत्ती पुरस्कार किशोर गटात सुरज राठोड (रत्नागिरी), तसेच
या सोहळ्यात अनेक खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.
मा. पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात पंच, खेळाडू तसेच इतर कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे मत मांडले.
सदर कार्यक्रमाला चक्रभेदी सोशल फौंडेशन देवरुख, रत्नागिरीच्या वैदेही सुधीर सावंत यांनी उपस्थित राहून पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्तीचे अभिनंदन करून त्याना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर सावंत यांनी केले.





