उद्या रविवारी संविधाननिष्ठ संघटनांच्या संयुक्त विद्यमाने चिपळुणात सामाजिक एकतेचा जागर : लोकमत पुणे संपादक संजय आवटे यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती

चिपळूण- येथील संविधाननिष्ठ संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्भय बनो..भारत जोडो’ अभियान अंतर्गत सामाजिक एकता परिषदेचे आयोजन उद्या रविवार दिनांक २ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे करण्यात आले आहे. या परिषदेस प्रमुख वक्ते म्हणून मा.संजय आवटे, संपादक लोकमत पुणे हे उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमाचे आयोजन संविधान सन्मान समिती, छत्रपती संभाजी ब्रिगेड, समता सैनिक दल, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचार मंच, जिजाऊ ब्रिगेड, राष्ट्र सेवा दल, पूज्य गांधी प्रतिष्ठान, भारतीय बौद्ध महासभा, चिपळूण मुस्लिम समाज संघटना, बौद्धजन पंचायत समिती, सत्यशोधक शिव प्रवर्तक समिती, अंजुमन दर्द मंदान, बौद्धजन उत्कर्ष समिती, कोकण सिरत कमिटी, ओबीसी संघर्ष समिती, दिव्यांग सेवा संस्था, मुस्लिम समाज विकास संघ, चिपळूण तालुका बौद्धजन हित संरक्षण समिती, कोकण कन्या फाउंडेशन, यशसिद्धी माजी सैनिक संघ, जमियते उलेमा चिपळूण, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आम्ही चिपळूणकर, चिपळूण मुस्लिम वुमन्स अँड चाइल्ड वेल्फेअर असोसिएशन आणि चिपळूण तालुका मुस्लिम महिला मंडळ या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. तरी या परिषदेला चिपळूण व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक ऐक्याचा संदेश अधिक बळकट करावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.




