कोकण विभागीय मंडळ सचिवांची तळवली हायस्कूल ला भेट

प्रतिनिधी (मंगेश जाधव )
पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता गुहागर या प्रशालेस कोकण विभागीय बोर्डाच्या सचिव मा.पुनिता गुरव मॅडम व इतर अधिकारी यांनी शनिवार दि. 8/8/2026 रोजी भेट दिली व इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा केंद्राच्या सर्व निकषांची पूर्तता केली आहे का, सर्व भौतिक सुविधा उपलब्ध आहेत का याची प्रत्यक्ष पाहणी करून सखोल माहिती घेतली व त्याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांनी विभागीय सचिव सौ. पुनिता गुरव मॅडम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी सौ. शिंदे मॅडम, पंचायत समिती विषय तज्ञ सौ. मोहिते मॅडम व गुहागर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. गोरीवले सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री. देवरुखकर सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करुन व परिचय करून दिला. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.




