अहमद मुबीन बामणे याचा भव्य सत्कार समारंभ : नॅशनल हायस्कूल हर्णैमध्ये एस. एस. सी. परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल गौरव


हर्णै: १५ ऑगस्ट २०२६ चे औचित्य साधून नॅशनल हायस्कूल हर्णै चा विद्यार्थी *अहमद मुबीन बामणे* यांने एस.एस.सी परीक्षेत *89.20% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक* पटकावल्याबद्दल त्याचा भव्य व शानदार सत्कार करण्यात आला.
दि हर्णै एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी हर्णै,तसेच *ग्रामपंचायत हर्णै. तालुका दापोली जिल्हा. रत्नागिरी* यांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला. यावेळी अहमद याला मान्यवरांच्या हस्ते *सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र,एक झाड व शुभेच्छा* देऊन गौरविण्यात आले. त्याबद्दल त्याचे पालक मुबीन बामणे ,शाहीन बामणे तसेच शाळेचे मुख्याध्यापक आसिफ भाटकर,शिक्षक ,संस्थेचे अध्यक्ष असलम खान, सेक्रेटरी मुबीन हरगे, खाजिन अजिम सारंग, उपाध्यक्ष इर्शाद महालदार, माजिद महाद्वार, साजीद महालदार,स्कूल कमिटी चेअरमन सईद चिकटे,व्हाईस चेअरमन सना काझी, पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याच्या यशामुळे नॅशनल हायस्कूल हर्णै च्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
याप्रसंगी उपस्थित मान्यवराने विद्यार्थ्यांनी मेहेनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करावे असे आवाहन केले. *अहमद मुबीन बामणे याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून अनेक परिसरातून त्याच्यावर अभिनंदनच वर्षा होत आहे*



