Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

द सिनियर सिटीझन मंगो गार्डन यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त लता प्रकाश पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रम

Oplus_16908288
द सीनियर सिटीजन मंगो गार्डन यांचा स्वातंत्र्यदिनानिमित्त दिनांक 16 8 26 रोजी प्रणाम बँकवेटस या ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . देशभक्ती पूर्ण वातावरणात आणि उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिकांनी उपस्थिती दर्शवली .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ लता प्रकाश पवार व प्रमुख पाहुणे श्री आर सी सिंग व डॉ.विक्रम पारेख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व प्रमुख पाहुण्यांचे अध्यक्ष सौ.लता प्रकाश पवार यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन स्वागत केले.
गीत गायन, नृत्याविष्कार व नाट्य यांमुळे या कार्यक्रमाला फारच रंगत आली. टर्म इन्शुरन्स ही नाटिका हे या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. या कार्यक्रमात ८० वर्षांवरील ६ जेष्ठ नागरिकांना पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अशा या रंगतदार कार्यक्रमास सूर्योदय बँकेकडून १०,००० रुपयांची देणगी देण्यात आली .त्यांचे कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी आभार व्यक्त केले. भोजनाचा आस्वाद घेऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!