महाराष्ट्र
ॲड.ज्योत्स्ना विनय काताळकर यांची कुटगिरी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

प्रतिनिधी (मंगेश जाधव)
गुहागर तालुक्यातील स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानच्या कुटगिरी गावच्या सल्लागार ॲड. ज्योत्स्ना विनय काताळकर मॅडम यांची मौजे कुटगिरी-पाती महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.
गावातील सामाजिक सलोखा, शांतता आणि एकोपा टिकवून ठेवण्यासाठी तसेच विविध तंटे सामंजस्याने सोडविण्यासाठी त्यांनी यापूर्वीही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत ग्रामस्थांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करून अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानच्या वतीने तसेच ग्रामस्थांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील सामाजिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.




