मराठी पत्रकार परिषद रत्नागिरीच्या उपाध्यक्षपदी शकील गवाणकर : सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

रत्नागिरी – गेली 40 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असणारे, पत्रकारिता डिग्री प्राप्त आणि पत्रकार भूषण सन्मानित रत्नागिरी शहरातील शकील गवाणकर यांची मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी च्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.शकील गवाणकर हे लेखक, व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध असून सहकारी महाराष्ट्र या पुण्यातून प्रसिद्ध होणाऱ्या मासिकाचे ते संपादक म्हणून कार्यरत होते,सन 2002 मध्ये 20 नोव्हेंबर रोजी त्यांचा नवी दिल्ली येथे उत्कृष्ट संपादक म्हणून गौरविण्यात आले होते.सहकार क्षेत्रात त्यांनी 21 वर्षे काम केले असून सहकारी वाढविण्यासाठी त्यांनी या कालावधीत महाराष्ट्रातील तब्बल 16 जिल्ह्यातील ग्रामीण भागात जावून सहकार वाढवण्यासाठी प्रयत्न केले आणि नवोदितांना सहकारी प्रशिक्षण दिले, शकील गवाणकर सध्या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे गेली 6 वर्षं अध्यक्ष पदी कार्यरत असून कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शासकीय तसेच विविध संस्थांनी त्यांचा सन्मान करत त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत,शकील गवाणकर यांच्या निवडीने सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तसेच शकील गवाणकर हे सध्या’पूर्णसत्य कोकण’चे रत्नागिरी प्रतिनिधी म्हणूनही काम पाहत आहेत.




