बेलापूरमध्ये ज्येष्ठांचा वाढदिवस व हृदयरोग मार्गदर्शन शिबीर संपन्न


*बेलापूरमध्ये ज्येष्ठांचा वाढदिवस व हृदयरोग मार्गदर्शन शिबीर संपन्न*
*नवी मुंबई प्रतिनिधी :* सेक्टर-८, कस्तुरबा गांधी उद्यान, सी.बी.डी. बेलापूर येथील ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संघटनेच्या वतीने ऑगस्ट महिन्यातील सभासदांचा एकत्रित वाढदिवस सोहळा व आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी हृदयरोग विषयक विशेष व्याख्यानाचे आयोजन फेस्कॉम मुंबई विभागाचे अध्यक्ष श्री. सुरेश पोटेसाहेब यांनी अपोलो हॉस्पिटल च्या माध्यमातून करून दिले होते.
या व्याख्यानासाठी अपोलो हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉ. चरण रेड्डी के. व्ही. (एम.डी. कार्डिओलॉजी) यांनी ज्येष्ठांना मार्गदर्शन केले. त्यांनी हृदयरोगाची कारणे, लक्षणे, आहार, व्यायाम आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच साठीनंतरचे आयुष्य निरोगी जगण्यासाठी पाच महत्त्वाची रहस्ये सांगून उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
श्री. सुरेश पोटे यांनी फेस्कॉमच्या कार्याची माहिती देऊन संघटनेने विभागीय कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी स्थानिक नगरसेवक श्री. कुलदीप सुरू उपस्थित होते. संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सचिव श्री. मोहन राणे यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता कराओकेच्या सुमधुर गीतांनी झाली.




