Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

गाव छोटं, काम मोठं! दापोलीच्या बोरिवली (आडीवाडी) गावाने पुन्हा दाखवून दिली एकीची ताकद; स्वखर्चाने अन् श्रमदानातून केला रस्ता चकाचक!*


प्रतिनिधी – सागर गोवळे
​बोरिवली (आडिवाडी):
“मनात आणलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही” हे केवळ म्हण पुरतं मर्यादित न ठेवता दापोली तालुक्यातील बोरिवली (आडीवाडी) येथील ग्रामस्थांनी ते पुन्हा एकदा प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोणत्याही शासकीय निधीची किंवा मदतीची वाट न पाहता, संपूर्ण गावाने एकत्र येत एकजुटीने आणि स्वखर्चाने श्रमदानाची मोठी मोहीम फत्ते केली आहे.
​रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेली झाडी, एसटी बस व इतर वाहनांना अडथळा ठरणारी झुडपे, तसेच वीज वाहिन्यांना (लाइटच्या तारांना) लटकणाऱ्या धोकादायक फांद्या हटवण्याचे काम ग्रामस्थांनी हातात घेतले. बोरिवली आडीवाडी ते पंचनदी आणि बोरिवली आडीवाडी ते चिखलगाव या दोन्ही मार्गांवर ही सफाई मोहीम राबवण्यात आली.
​स्वतःचा खर्च, स्वतःची अवजारे आणि गावाची एकी!
विशेष म्हणजे या कामासाठी लागणारी अवजारे, कटर मशीन्स आणि त्यासाठी लागणारे पेट्रोल-डिझेल अशा सर्व गोष्टींचा खर्च ग्रामस्थांनी स्वतःच्या खिशातून केला आहे.
​दरवर्षीचीच परंपरा!
हे काम म्हणजे या वर्षीचा काही अचानक केलेला स्टंट नाही, तर दरवर्षी न चुकता बोरिवली आडीवाडीचे ग्रामस्थ हे काम स्वतःहून करत असतात. प्रशासकीय दिरंगाईवर बोटे दाखवत बसण्यापेक्षा ‘आपलं गाव, आपली जबाबदारी’ हे सूत्र पकडून हे लोक एकत्र येतात.
​गावाची लोकसंख्या किंवा आकार छोटा असेल, पण इथल्या लोकांच्या विचारांची आणि एकजुटीची उंची खूप मोठी आहे. आजूबाजूच्या कित्येक गावांसाठी आणि प्रशासनासाठी बोरिवली आडीवाडीचा हा ‘आत्मनिर्भर’ पॅटर्न एक आदर्श वस्तुपाठ ठरत असून, सध्या या आगळ्यावेगळ्या श्रमदानाची जोरदार चर्चा सर्वत्र रंगली आहे!
​बोरिवली आडीवाडी ग्रामस्थांच्या या धडपडीला आणि एकजुटीला कडक सलाम!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!