निसर्गप्रेमी संस्था कामोठे यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

निसर्गप्रेमी संस्था कामोठे यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात सपंन्न
प्रतिनिधी (मंगेश जाधव)
दिनांक १९ जुलै २०२६ रोजी के. के. सिनेमा समोरील सेक्टर ३१ उद्यान, कामोठे नवी मुंबई येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये निसर्गप्रेमी संस्थेचे श्री सुनील करपे सर, श्री दिलीप राठोड साहेब, श्री जयप्रकाश जगताप साहेब, श्री कुलकर्णी साहेब, श्री सिद्धेश कदम सर, श्री लवटे सर, श्री ठाकरे सर तसेच इतर मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मोठ्या उत्साहात वृक्षारोपण केले. या उपक्रमामुळे परिसर अधिक हिरवागार, स्वच्छ व सुंदर होण्यास निश्चितच मदत होईल. तसेच नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती निर्माण होण्यासही या कार्यक्रमाचा मोठा हातभार लागला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, नागरिक, स्वयंसेवक व निसर्गप्रेमी यांचे निसर्गप्रेमी संस्था कामोठे तर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले




