Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

संपादक बाळकृष्ण कासार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते सन्मानित : पद्मश्री अशोक सराफ यांच्या उपस्थितीत अविस्मरणीय क्षण

सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

*मुंबई प्रतिनिधी*

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा गौरव करणारा अविस्मरणीय क्षण राज्यस्तरीय मराठी भाषा साहित्य संमेलनात अनुभवायला मिळाला. कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) आणि स्वर्णिका पुस्तक प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या भव्य संमेलनात लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांचा ज्येष्ठ साहित्यिक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
कासार यांचा सन्मान म्हणजे केवळ पुरस्कार नव्हता, तर आयुष्यभराच्या कार्याची मिळालेली प्रेमाची आणि कर्तृत्वाची पावती होती. त्यांना आता पर्यंत पन्नासहून जास्त पुरस्कार मिळाले आहेत.
या ऐतिहासिक सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ सिनेअभिनेते पद्मश्री अशोक सराफ, उद्योजक, लेखक व जागतिक साहित्यरत्न पुरस्कारप्राप्त निळकंठ श्रीखंडे, तसेच ज्येष्ठ पत्रकार, संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांची मान्यवर उपस्थिती लाभली. या दिग्गजांच्या उपस्थितीमुळे संमेलनाचा प्रत्येक क्षण अधिक प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.
सभागृहात साहित्य, संस्कृती आणि मराठी भाषेवरील निस्सीम प्रेमाची अनोखी अनुभूती होती. मान्यवरांच्या विचारांनी उपस्थितांना नवी ऊर्जा, नवी दिशा आणि मराठी भाषेच्या जतन-संवर्धनासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा दिली.
मराठी साहित्यविश्वातील दिग्गज एका व्यासपीठावर एकत्र येऊन नवोदितांना आशीर्वाद देत होते, हा क्षण उपस्थितांसाठी आयुष्यभर जपून ठेवावा असा ठरला. साहित्य, पत्रकारिता, कला आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचा झालेला हा सन्मान मराठी संस्कृतीच्या वैभवात भर घालणारा ठरला. राज्यस्तरीय मराठी भाषा साहित्य संमेलनाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून, ती आपल्या संस्कृतीचा, अस्मितेचा आणि माणुसकीचा अमूल्य ठेवा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!