तळवली हायस्कूल मध्ये ‘रक्षाबंधन’ कार्यक्रम उत्साहात साजरा

प्रतिनिधी (मंगेश जाधव)
पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता. गुहागर जि. रत्नागिरी या प्रशालेत ‘रक्षाबंधन’ कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन मुख्याध्यापक श्री. एम. ए.थरकार सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागातर्फे करण्यात आले होते. विभाग प्रमुख श्री. कुळे सर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. जेष्ठ शिक्षिका सौ. नाईक मॅडम यांनी रक्षाबंधन या कार्यक्रमातुन भाऊ-बहिन हे पवित्र नाते दृढ होते असे सांगितले.तसेच ऐतिहासिक संदर्भ देऊन रक्षाबंधनाचे महत्त्व स्पष्ट केले.
रक्षाबंधन कार्यक्रमात प्रशालेतील इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतचे सुमारे 400 विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्वत्र आनंदी वातावरण निर्माण झाले होते.सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींनी राखी बांधली. तसेच यावेळी सर्व शिक्षक बंधुनाही शिक्षिकांनी राखी बांधली. हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळे आकर्षण होते.
या वेळी शाळेच्या परिसरात असलेल्या झाडांनाही विद्यार्थिनींनी राखी बांधली व त्या झाडांच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारली. व त्यातून पर्यावरण संतुलनाचा संदेश पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला.
हा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. त्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जेष्ठ शिक्षक श्री. देवरुखकर सर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच जेष्ठ श्री. साळुंके सर, सौ. नाईक मॅडम, श्री. गुरसळे सर, श्री. बागल सर, श्री. केळस्कर सर, श्री. कुळे सर, श्री. गवळी सर,श्री.कोवळे सर, प्रा. जड्याळ सर, प्रा.कांबळे मॅडम, प्रा.आयरे मॅडम, प्रा. जड्याळ मॅडम, लिपिक श्री. परेश कदम सर, अक्षय चव्हाण, सौ. पालकर या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी प्रा. आयरे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
@




