Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

चिपळूणच्या अपरांत हॉस्पिटलमध्ये झालेल्या प्रसंगाची सत्य परिस्थिती : रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि प्रशासन यांची बाजू !

चिपळूण येथील अपरांत हॉस्पिटलमध्ये एका अत्यवस्थ वृद्ध रुग्णावर केलेल्या आपत्कालीन उपचारांमागची सत्य परिस्थिती कथन करण्यासाठी हे निवेदन देत आहोत.

*घटनेचे वास्तव काय?*

70 वर्षीय वृद्ध रुग्णाला हृदयविकाराचा तीव्र झटका (Heart Attack) आल्याने अत्यंत नाजूक अवस्थेत अपरांत हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. मोठा हार्ट अटॅक आल्यावर जे इंजेक्शन दिल्यावर पेशंटचा जीव सुरक्षितरीत्या वाचवला जाऊ शकतो ते इंजेक्शन, एक दिले होते, त्याची अजून मात्रा देणे आवश्यक होते म्हणून दुसरे इंजेक्शन सुद्धा दिले ..काही सेकंदात हे करावे लागते.. ते नाही केले तर पेशंटची तब्येत खालावू शकते..

रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तातडीने नातेवाईकांच्या संमतीने Abbott कंपनीचे Inj. TENECTELEX 40 हे रक्त पातळ करण्याचे अत्यंत महत्त्वाचे इंजेक्शन दिले. या एका इंजेक्शनची किंमत ₹53,829.92 इतकी असून, रुग्णाची गंभीर स्थिती पाहता अशी दोन इंजेक्शन्स द्यावी लागली (एकूण किंमत ₹1,07859.84) रुग्ण पुढील 36 तास आयसीयू (ICU) मध्ये उपचार घेत होता. या संपूर्ण उपचारांचे, उपचारादरम्यानच्या तपासण्या आणि औषधांचे एकूण बिल ₹1,47,000 झाले. *यातील हॉस्पिटलचे प्रत्यक्ष बिल केवळ 20 ते 22 हजार रुपये एवढेच होते…*.

जेव्हा एखादा क्रिटिकल पेशंट हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा त्या पेशंट सोबत आहे त्या व्यक्ती किंवा नातेवाईक हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन येतात, त्यावेळी घरातील जबाबदार व्यक्ती त्यांच्यासोबत असतेच असे नाही अशावेळी आम्ही कोणाशी बोलायचे असा प्रश्न असतो, अशावेळी बोलण्यामध्ये वेळ फार वाया न घालवता पेशंटचा जीव तत्परतेने वाचवणे हेच फार महत्त्वाचे असते असे डॉक्टर्स व जीवरक्षक यंत्रणा चालवणारे आम्ही सर्व कर्मचारी समजतो.

अपरांत हॉस्पिटलमधील तत्पर उपचारांमुळे रुग्णाची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर नातेवाईक पुढील उपचारांसाठी (अँजिओप्लास्टी) रुग्णाला डेरवण येथे घेऊन गेले.
अशावेळी बिलाचे डिटेल्स समजून न घेता म्हणजे, औषधांचे पैसे किती व हॉस्पिटलचे प्रत्यक्ष पैसे किती… हे समजून न घेता केवळ गैरसमजातून बिल जास्त झाले म्हणून जीवरक्षक उपचार करणाऱ्या मेरिट होल्डर MD मेडिसिन अशा उच्च विद्या विभूषित डॉक्टरांवर आणि हॉस्पिटलवर जी शंका घेतली त्यावर बाजू मांडण्याची संधीच नाही मिळाली…

हॉस्पिटलचा स्टाफ यामुळे दबावाखाली काम करत आहे, या घटनेमुळे इथून पुढे पहिले पेशंटचा जीव वाचवायचा की, पैशाचा अंदाज देऊन त्यांचा निर्णय येईपर्यंत थांबून राहायचे ? कारण पेशंटची तब्येत खालावली तर डॉक्टर आणि हॉस्पिटलला जबाबदार ठरवलं जाईल का ? हा प्रश्नच आता केवळ अपरांतच नव्हे तर चिपळूणच्या समग्र वैद्यकीय क्षेत्रासमोर या प्रसंगामुळे उभा राहिला आहे..

* सिरियस पेशंट आल्यावर त्याला बराच वेळ डॉक्टरनी बघितले नाही असे झाले नव्हते.

* ऍडमिशनच्या आधी पैसे मागितले (डिपॉझिट) मागितले नव्हते किंवा त्यासाठी आग्रह केला नव्हता.

* डिपॉझिट ची वाट न बघता रुग्णाची गंभीर परिस्थिती पाहून हॉस्पिटलने त्वरित उपचार सुरू केले.

*वास्तवात उपचार सुरू करण्यापूर्वीसुद्धा पेशंटकडून एकही पैसा हॉस्पिटलमध्ये जमा करून घेतला नाही (डिपॉझिट) आणि उपचार झाल्यावर पण नाही.. पण रुग्ण बरा झाला..* त्याला पुढील उपचारासाठी पूर्ण स्थिर अवस्थेमध्ये मोठ्या हॉस्पिटलला पाठवण्यात आले…रुग्ण आल्यावरचा बिघडलेला… व जातानाचा सुधारलेला हृदय आलेख ECG देखील हेच दर्शवतो.

पूर्णपणे स्थिर स्थितीत अँजिओग्राफी / एन्जिओप्लास्टी साठी, पेशंटला बिलाचा एकही पैसा जमा करून न घेता पुढील हॉस्पिटलला पाठवण्यात आले, हे वास्तव आहे..

हॉस्पिटल संबंधित बिल कमी करण्यास नेहमीच पूर्णपणे तयार होते.

* *तरुण उच्च विद्या विभूषित डॉक्टर व स्टाफचे खचलेलं मनोधैर्य परत कसे आणणार ?*

* *आता येणाऱ्या रुग्णाला धैर्य व विश्वास कसा देणार हाच हॉस्पिटल समोर मोठा प्रश्न आहे.*

* *पेशंटचा पहिला विचार केला हे चुकले का ?*

* *पेशंटला प्रथम उपचार दिले ते चुकले का ?*

* *आधी पैसे सांगायला हवे होते का ?*

* *आधी पैसे भरून घ्यायला हवे होते का ?*

* *पेशंटचा विचार न करता नातेवाईकांना पैसे भरणे जमेल का असे विचारायला हवे होते का ?*

*अजून खूप प्रश्न आहेत.. पण उत्तर काही गवसत नाही ….*

*अपरांत हॉस्पिटल व्यवस्थापन*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!