Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

मुंढर गावच्याआदर्श सरपंच अमिषा गमरे यांना सह्याद्री रत्न पुरस्काराने सन्मानित

सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

प्रतिनिधी (मंगेश जाधव)
गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रुप ग्रामपंचायत मुंढर-कातकरी या ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच अमिषा अजित गमरे यांना पुणे येथील नालंदा ऑर्गनायझेशनच्या या सामाजिक संस्थेने महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीत चाललेल्या कार्यक्रमाची सर्वेक्षण करून आदर्श सरपंच म्हणून काही जणांची निवड करण्यात आली. त्यात अमिषा गमरे यांना सह्याद्रीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

अमिषा गमरे यांना प्रदान करण्यात आलेला सह्याद्रीरत्न पुरस्कार हा खर म्हणजे त्यांचे निस्वार्थी कार्याची पोचपावती आहे, अमिषा गमरे या रोज एकदिवस ही न चुकवता ग्रामपंचायत कार्यालयात नियमित हजर राहून कारभार सांभाळतात, शासनाच्या प्रत्येक योजना राबवून ग्रामस्थांना त्याचा फायदा होईल याकडे त्यांचा कल असतो. गावातील महिला सबलीकरण, विविध विकासक कामे, पंचायत समिती, जिल्हापरिषदेच्या निधीतून गावात विविध योजना राबविणे यामुळे गावाला आरोग्य, शिक्षण, पर्यावरण क्षेत्रात पुरस्कार मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे या सर्वांची दखल घेऊनच नालंदा ऑर्गनायझेशन या सामाजिक संस्थेने सह्याद्रीरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित केले; सोबतच मुंढर-कातकिरी ग्रामपंचायतचे अधिकारी सुरेश गोरे यांनाही त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सह्याद्रीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!