Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

भाटघरमध्ये रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धा उत्साहात: ५३ महिलांचा सहभाग, भारंगीची खीर ठरली आकर्षण


(दापोली- प्रतिनिधी:सागर गोवळे.)
​भाटघर:डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (कृषी महाविद्यालय, दापोली) च्या ग्रामीण जीवन कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (रावे) भाटघर येथील हनुमान मंदिरात रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आहारातील रानभाज्यांचे पौष्टिक व औषधी महत्त्व आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीबाबत जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
​मुगीज येथील ‘बीजांकुर’, भाटघरचे ‘कृषी कन्या’ आणि सोवेली येथील ‘मृदगंधा’ व ‘वसुंधरा’ या विद्यार्थी गटांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रादेशिक रावे प्रमुख डॉ. विजयकुमार देसाई यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनात सुमारे ४० प्रकारच्या दुर्मिळ रानभाज्यांचे नमुने व त्यांच्या औषधी गुणधर्मांची माहिती देणारे फलक मांडण्यात आले होते.
​रानभाज्यांपासून मोमोज आणि कटलेट
स्पर्धेत ५३ महिलांनी सहभाग नोंदवत रानभाज्यांपासून मोमोज, कटलेट, खीर, पराठे, घावण आणि करंजी यांसारखे पारंपरिक व नवसंशोधित पदार्थ तयार केले. डॉ. प्रविण झगडे आणि डॉ. आशिष शिगवण यांनी चव, पौष्टिकता व सर्जनशीलतेच्या निकषांवर या पदार्थांचे परीक्षण केले.
​पाककला स्पर्धेचे विजेते:
​मुगीज–भाटघर गट:
​प्रथम: विजया कदम (भारंगी खीर)
​द्वितीय: अंकिता मदगुल (भारंगी कटलेट)
​तृतीय: अर्चना तांबे (टाकळा पुरी)
​उत्तेजनार्थ: प्राजक्ता खळे (कावेरीची वडी)
​सोवेली (चव्हाणवाडी व सुतारवाडी) गट:
​प्रथम: मीनाक्षी शिंदे (मिक्स भाजी पराठा)
​द्वितीय: अरुणा चव्हाण (सुरणाची वडी)
​तृतीय: माधुरी चव्हाण (शतावरीची भजी)
​उत्तेजनार्थ: संजीवनी सोवेलकर (पेव्याची भाजी)
​या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर, स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, डॉ. अशोक चव्हाण, डॉ. विजय देसाई व विषयतज्ज्ञ डॉ. महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रावे विद्यार्थी व कृषी कर्मचाऱ्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!