Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

अनिरुद्ध शेखर निकम यांची जिनिव्हा, स्वित्झर्लंड 🇨🇭 येथे होणाऱ्या “Youth Empowerment Forum 2026” साठी निवड

– जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे ३ ते ६ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या Youth Empowerment Forum 2026 साठी सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा आमदार शेखर निकम यांचे चिरंजीव अनिरुद्ध निकम यांची निवड झाली आहे.

United Nations आणि Center for Global Dialogue & Leadership यांच्या आयोजनातून होणाऱ्या या *आंतरराष्ट्रीय युवा मंचामध्ये जगभरातील सुमारे १०० युवा सहभागी होणार आहेत.*

या फोरम दरम्यान United Nations Headquarters Geneva, World Trade Organization आणि International Labour Organization येथे संस्थात्मक व अभ्यासभेटी, विशेष ब्रीफिंग तसेच तज्ज्ञांशी संवाद आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय Leadership and Skill Building आणि Humanitarian Diplomacy यांसारख्या विषयांवरील कार्यशाळा तसेच UN Sustainable Development Goals Grant Pitch Competition होणार आहे. या माध्यमातून Youth Empowerment, Global Policy, Sustainable Development, Labour Policy आणि International Trade Policy या विषयांवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील संवाद करण्याची संधी मिळणार आहे.

अनिरुद्ध निकम यांनी मराठी माध्यमातून सह्याद्रि शिक्षण संस्थेत शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सह्याद्रि कृषी महाविद्यालयातून कृषी पदवी घेतली. पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील University of Queensland या जागतिक क्रमवारीतील ४०व्या मानंकित विद्यापीठातून M.Sc. Agriculture ही पदव्युत्तर पदवी २०२२ ते २०२४ या कालावधीत पूर्ण केली.

*शिक्षणासोबत अनिरुद्ध निकम यांनी Australian Queensland Department of Agriculture and Fisheries (QDAF) सोबत कृषी संशोधन क्षेत्रात काम केले असून, Tropical Fruit Robustness and Post-Harvest Management या ऑस्ट्रेलियन सरकारच्या प्रकल्पाशी संबंधित संशोधनात योगदान दिले आहे. त्यांच्या शैक्षणिक व संशोधन कार्याची दखल घेत Queensland Government आणि University of Queensland यांच्या वतीने त्यांना डिसेंबर २०२४ मध्ये Dean’s Commendation Award देऊन गौरविण्यात आले आहे.*

याशिवाय ते चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष असून, क्रीडा, सामाजिक, ग्रामीण विकास आणि युवा उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. तसेच सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी ते सांभाळत आहेत.
शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील योगदान, आंतरराष्ट्रीय अनुभव, संस्थात्मक नेतृत्व आणि क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील सक्रिय सहभाग यामुळे अनिरुद्ध निकम यांची या आंतरराष्ट्रीय मंचासाठी निवड झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!