निट,टीट पेपर फुटी प्रकरणी रत्नागिरी जिल्हा जिजाऊ ब्रिगेडतर्फे तहसीलदारांना दिले निवेदन

*चिपळूण/दिपा कोलतेकर*
मागील १८ दिवसापासून वैज्ञानिक, शिक्षणतज्ञ, पर्यावरण रक्षक सोनम वांगचुक आणि अनेक विद्यार्थी दिल्ली येथील जंतर मंतर वर आमरण उपोषणाला बसलेले आहेत.NEET,TETआणि इतर परीक्षांच्या सततच्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले असून ते निराश झालेले आहेत व त्यांची मानसिकता खचलेली आहे.परंतु सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची कोणतीही काळजी दिसत नाही.केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गांभीर्याने या प्रश्नाची दखल घेऊन आपला राजीनामा द्यावा यासाठी सोनम वांगचुक जंतर मंतर येथे उपोषण करीत आहेत.त्यांच्या या मागणीला आमचाही पाठिंबा आहे.पारदर्शक शैक्षणिक व्यवस्थेसाठी तसेच ज्या विद्यार्थ्यांनी सततच्या पेपरफुटीमुळे आत्महत्या केल्या त्या कुटुंबांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत मिळावी यासाठी विद्यार्थ्यांचे हे आंदोलन दिल्ली येथील जंतर मंतर येथे सुरू आहे.परंतु सरकारने अजूनही या विद्यार्थी आंदोलनाची दखल घेतलेली नाही.वैज्ञानिक सोनम वांगचुक आणि त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेले विद्यार्थी मरणासन्न अवस्थेला येऊन पोहोचले आहे. विद्यार्थ्यांप्रती सरकारची असलेली अनास्था आणि उदासीनता ही या देशाच्या शिक्षण व्यवस्थेला उध्वस्त करणारी असून जिजाऊ ब्रिगेड याचा जाहीर निषेध करीत आहे. केंद्र सरकारने ताबडतोब केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि सोनम वांगचुक यांचे उपोषण सोडवून त्यांचे प्राण वाचवावे असे आवाहन आम्ही या निवेदनाद्वारे सरकारला करीत आहोत.
- निवेदन देताना रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष स्नेहल चव्हाण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दीपा कोलतेकर, खेड तालुका अध्यक्ष रोहिणी मोरे, शहर कार्याध्यक्ष प्रीती साळवी, शहर संघटक दिलबर खान, माजी नगरसेविका सीमाताई चाळके उपस्थित होत्या.




