Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

ओतारी आई चॅरिटेबल फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : कळवंडे शाळेत मुख्याध्यापक, विद्यार्थी रमले ब्रेन बुस्टर मध्ये

मान्यवरांची उपस्थिती

चिपळुण : ओतारी आई चॅरिटेबल फाऊंडेशन ने गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक अनेक कार्यक्रम राबविले. निस्वार्थी भावनेने त्यांची सर्व टीम काम करीत आहे. “ब्रेन बुस्टर” कार्यक्रम हा विदयार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधतोय. असे उपक्रम वारंवार राबवा, तुमच्या उपक्रमांना शाळा संपूर्ण सहकार्य देईल अशा शब्दात कळवंडे पु.प्रा. मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीता शिंदे यांनी फाऊंडेशनचा विशेष गौरव केला.कळवंडे शाळेत ओतारी आई चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे मागील शैक्षणिक वर्षात “ब्रेन बुस्टर” हा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला होता. यंदाचे शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर संस्थेच्या पदाधिकारी व संबंधित विषयतज्ञानी भेट देऊन सहभागी विधार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी फाऊंडेशनच्या संस्थापिका, प्रेरणास्थान संगीता ओतारी यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेश व अपेक्षित सहकार्य याबद्दलची सविस्तर चर्चा करण्यात आली.सचिव – सौ. शर्मिला धूरी, फाउंडेशनचे ज्येष्ठ संचालक – श्री. धनंजय काळे, मानसशास्त्रज्ञ , ब्रेन बुस्टरचे मार्गदर्शक – श्री. दिपक माळकरी, आरोग्य विभाग प्रमुख व महिला कौशल्य आणि ध्यान, प्राणायाम मार्गदर्शक – सौ. पूजा पुजारी उपस्थित होते.
वर्षभरात विधार्थ्यांच्या शैक्षणिक, स्वभाव परिवर्तन, विशेष शैक्षणिक यश,स्पर्धामधील यश, पालकांचा पाठिंबा आणि या उपक्रमाद्वारे भविष्यात होणारे लाभ याबाबत सौ. गीता शिंदे सहकारी शिक्षक व उपस्थितानी समाधान व्यक्त केले व अशा उपक्रमांचा शाळेच्या प्रगतीसाठी शंभर टक्के लाभ होत असल्याचे सांगितले.
प्रकल्प मार्गदर्शक श्री. माळकरी यांनी प्रत्येक सहभागी विधार्थ्यांशी संवाद साधला. मिळालेले यश व अपेक्षित मुद्दे स्पष्ट केले. शाळेने असे उपक्रम राबवित जा. आम्ही वाट पहातो आहोत असे सांगून ओतारी आई यांच्या त्यागमय आयुष्याला त्यांची कन्या संगीताताई यांनी सामाजिक सेवेत उतरून करीत असलेल्या कार्याचे भरभरुन कौतुक केले. या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते व माजी आमदार सदानंद चव्हाण यांचे सुपुत्र श्री. पुष्कर चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी यांनीही या उपक्रमाची माहिती घेतली. शाळेच्या या भेटीत सर्व शिक्षिका, पालक वर्ग, गाव प्रतिनिधीही उपस्थित होते.
चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात फाऊंडेशनने काम सुरु केले त्या सर्व शाळांच्या प्रगतीचा अहवाल व शाळांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक शाळा व पालकांनी ब्रेन बुस्टर, आरोग्य विषयक शिबिरांची मागणी लक्षात घेऊन फाऊंडेशन चे विविध मोफत उपक्रम ग्रामीण परिसरा पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे संस्थापक अध्यक्षा संगीता ओतारी व सचिव सौ. शर्मिला धुरी यांनी स्पष्ट केले आहे. या सर्व उपक्रमांना फाऊंडेशनचे ज्येष्ठ संचालक श्री. शेखर धोंगडे यांचेही मार्गदर्शन लाभत असून या शाळाभेटी दरम्यान त्यानीही शुभेच्छा दिल्या. स्वयंसेवक यशवंत गोरिवले, स्टाफ . रविना पवार यांनीही अशा उपक्रमांसाठी मेहनत घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!