भोम महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण

यशवंत शिक्षण संस्था, भोम संचालित महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भोम या विद्यालयात इयत्ता ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी एकूण २०० रोपट्यांचे वृक्षारोपण भोम विद्यालय आवार, परिसरातील भोम लालबाग, कापरे रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी विद्यालयाच्या उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, राष्ट्रीय हरित सेना, स्काऊट गाईड, ज्ञान प्रबोधिनी केंद्राच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. यावेळी संस्था मा. सचिव श्री प्रशांत शिर्के मुख्याध्यापक श्री तानाजी कांबळे शिक्षक श्री गणेश सोनवणे, श्री मुकुंद पोटभरे, श्री संभाजी कुरुंद, श्री धनाजी देसाई, श्री स्वप्नील आंबेडे, श्री सचिन केंबळे, शिक्षिका सौ मीनल शिंदे आदी यांनी विद्यालयात व परिसरात वृक्षारोपण केले.
या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात साग, आंबा, फणस, पिंपळ, वड, काजू, खैर, जांभूळ, कोकम आदी झाडांची लागवड शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आली. लावलेल्या रोपट्यांची निगा, काळजी, संगोपन, देखभाल, संरक्षण, जोपासना प्रत्येक झाडासाठी दोन विद्यार्थी याप्रमाणे करण्याचे संबधित विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
यशवंत शिक्षण संस्था, भोम मा. सचिव श्री प्रशांत शिर्के, मुख्याध्यापक श्री तानाजी कांबळे शिक्षक श्री गणेश सोनवणे, श्री मुकुंद पोटभरे, श्री संभाजी कुरुंद श्री धनाजी देसाई, श्री स्वप्नील आंबेडे, श्री सचिन केंबळे, शिक्षिका सौ मीनल शिंदे तसेच शिपाई वर्ग यावेळी उपस्थित होता.





