मतदार यादीची विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम – SIR चे 100% कामकाज पूर्ण करणारा महाराष्ट्रातील पहिला मतदारसंघ बनण्याचा मान 265 – चिपळूण या विधानसभा मतदारसंघाने पटकावला
सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

चिपळूण -मा. भारत निवडणूक आयोग व मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार मतदार यादीची विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम SIR (Special Intensive Revision) अंतर्गत मतदार नोंदणी अधिकारी (BLO) 30/06/2026 ते 08/08/2026 या कालावधीत घरोघर भेटी देऊन मतदार यादीचे पुनरीक्षण करीत आहेत.
265 चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील एकूण 336 मतदान केंद्रे समाविष्ट आहेत. मतदारसंघातील एकूण मतदार संख्या 2,71,433 इतकी असून त्यापैकी 1,38,675 पुरुष मतदार, 1,32,758 स्त्री मतदार आहेत.
मा. श्री. मनोज जिंदल, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री. आकाश लिंगाडे, मतदार नोंदणी अधिकारी (265 चिपळूण विधानसभा मतदारसंघ) तथा उपविभागीय अधिकारी चिपळूण यांच्या नेतृत्वाखाली मतदार यादीचे पुनरीक्षण वेगाने पूर्ण करण्यात आले आहे. या कामामध्ये अहोरात्र काम करणाऱ्या मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचा सिंहाचा वाटा आहे.
SIR प्रक्रियेतील कामकाज –
EF डिजिटायझेशन पूर्ण झालेले – 2,45,487 (90.44%)
Uncollectable EF – 25,946 (9.56%)
No Mapping – 7,583 (2.79%)
वरील कामकाज पूर्ण करण्यासाठी खालील अधिकारी/कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.
अ) सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी –१)श्री प्रवीण आबाजी लोकरे – तहसीलदार, चिपळूण.
२) श्रीमती अमृता साबळे तहसीलदार संगमेश्वर.
ब) अति. सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी-
१)श्री शिवाजी शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी चिपळूण.
२) श्रीमती उमा गाडगे पाटील, गटविकास अधिकारी चिपळूण.
३) श्री. आनंद लोकरे, गटविकास अधिकारी संगमेश्वर.
४) श्री शत्रुघ्न मेहत्रे, तालुका कृषी अधिकारी चिपळूण
५) श्री संजय जाधव, मुख्याधिकारी नगर परिषद चिपळूण.
६) श्री प्रशांत भोसले, मुख्याधिकारी नगर पंचायत देवरुख.
७) श्री जी.ए. खामकर, नायब तहसीलदार उ.वि.अ. कार्यालय चिपळूण.
८) श्री शशिकांत साळुंखे, निवासी नायब तहसीलदार चिपळूण.
९) श्री. मिलिंद सावंत, नायब तहसीलदार संगमेश्वर,
१०) श्री. सुदेश गोताड, नायब तहसीलदार संगमेश्वर,
AERO यांचे सहायक म्हणून नियुक्त कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक, BLO यांचे सहायक म्हणून काम करणारे ग्राम महसूल अधिकारी, शिक्षक, केंद्रप्रमुख, महसूल सेवक, पोलीस पाटील, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, तसेच सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी/ऑपरेटर, संकलन टीम, IT टीम यांच्या मदतीने हे काम पूर्ण होऊ शकले.
दिनांक २७/०७/२०२६ ते दिनांक ०८/०८/२०२६ पर्यंत पुढीलप्रमाणे कामकाज होणार आहे.
अ)BLO स्तरावर-
१) Uncollectable EF ची फेरपडताळणी करणे (Reverification)
२) Unmapped मतदारांचे मॅपिंग करण्याचा प्रयत्न करणे.
३) Anomalies दूर करणे.
ब) ERO,AERO स्तरावर-
डिजिटाईज झालेल्या EF ची तपासणी करणे.
अशा प्रकारे २६५ चिपळूण विधानसभा मतदारसंघ हा SIR – मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण पूर्ण करणारा महाराष्ट्रातील पहिला मतदारसंघ ठरला आहे.




