Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

दापोलीत ‘रानमाया’ रानभाजी प्रदर्शन व पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न रानभाज्यांच्या संवर्धनावर भर



(दापोली -प्रतिनिधी: सागर गोवळे.)
​वणौशी / दापोली:
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाद्वारे (RAWE) वणौशी येथे ‘रानमाया’ रानभाजी प्रदर्शन व पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्थानिक रानभाज्यांची ओळख, पोषणमूल्य, आरोग्यविषयक महत्त्व आणि संवर्धन याबद्दल जागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
​४५ प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन व नाविन्यपूर्ण पाककृती
कृषिस्नेही, कृषीसखी गट आणि कृषी विस्तार शिक्षण विभागातर्फे आयोजित या प्रदर्शनात सुमारे ४० ते ४५ प्रकारच्या दुर्मिळ रानभाज्यांचे जिवंत नमुने मांडण्यात आले होते. याप्रसंगी आयोजित पाककृती स्पर्धेत स्थानिक महिलांनी सहभाग नोंदवत रानभाजी लाडू, भारंगीची खीर, करटोली चिप्स, करटोली मोदक, रानभाजी समोसे, सुरणाचा हलवा व श्रावण विशेष बोंबील अशा ४५ नाविन्यपूर्ण पाककृती तयार केल्या.
​पाककृती स्पर्धेचा निकाल
​प्रथम क्रमांक: प्रिया घडाशी (रानभाजी लाडू)
​द्वितीय क्रमांक: अदिती परांजपे (भारंगीची खीर)
​तृतीय क्रमांक: वैशाली कदम (करटोली चिप्स)
​उत्तेजनार्थ: तन्वी कदम (सुरणाचा हलवा), नियती गुरव (करटोली मोदक), सानिया आतपणे (रानभाजी समोसे)
​तज्ज्ञ मार्गदर्शनातून मूल्यवर्धनाचा संदेश
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आशिष शिगवण यांनी प्रास्ताविकाने केली, तर डॉ. प्रवीण झगडे व डॉ. शिगवण यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. प्रमुख पाहुण्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. मृदुला निंबकर यांनी महिलांच्या प्रयत्नांचे आणि वणौशीच्या जैवविविधतेचे कौतुक केले. विषय विशेषज्ञ डॉ. महेश कुलकर्णी यांनी काळी मिरी, घोरकंद, कणगर, रताळी, करांदा आणि शेवाळकंदा यांसारख्या वनस्पतींची लागवड, प्रक्रिया, मूल्यवर्धन व विपणनावर मार्गदर्शन केले.
​विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग
जि. प. प्राथमिक शाळा, वणौशी गुरववाडीच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन पारंपरिक रानभाज्यांचे ज्ञान जाणून घेतले. तसेच डॉ. रणजीत महाडिक, डॉ. समीर काळे, श्री. गोपाळ परांजपे, श्री. महेश गुरव, उपसरपंच श्री. अमित नाचरे व मुख्याध्यापिका सौ. मनाली नाचरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
​हा कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई व विषयतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कृषी सहाय्यक समीर उसरे, श्रीयश पवार, चंद्रकांत साळवी आणि कृषी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशासाठी विशेष मेहनत घेतली. डॉ. प्रवीण झगडे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!