Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

एस टी च्या भोंगळ कारभारामुळे ग्रामीण भागातील महिला त्रस्त

रत्नागिरी प्रतिनिधी- शकील गवाणकर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ने महिलांसाठी जी सध्या कार्ड योजना सुरू केली आहे,तिला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, वास्तविक पाहता हे करायची गरज नव्हती,मुळात महिलांना हाफ तिकीट आहे,आणि कार्ड काढून काय साध्य होणार आहे हा संशोधनाचा विषय आहे.
कार्ड तयार झाल्याचे मेसेज महिलांना येत आहेत,आपले कार्ड तयार झाल्याने ग्रामीण भागातील महिला रत्नागिरी बसस्थानक येथे येत आहेत, मात्र तेथे सांगण्यात येत आहे की,सरवर डावून आहे,दोन तीन दिवसांनी या, त्यामुळे ग्रामीण भागातील आलेल्या महिलांची फेरी फुकट जावून‌ त्यांचा पैसा आणि वेळ वाया गेला, याबाबत अनेक महिलांनी राग व्यक्त करत एस टी महामंडळाच्या या भोंगळ कारभाराची लक्तरे काढली.
तिकीट बुकिंग,आणि चौकशी केंद्रात गेल्यावर तेथील कर्मचाऱ्यांची वागणूक अतीशय विचित्र आहे,धड साधी माहिती ती ते देत नाही,जणू काही आपण प्रवाशांवर उपकार करत असल्याचा त्यांचा समज आहे,कोटी रुपये खर्च करून बसस्थानके तयार झाली,मात्र कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेमध्ये कोणताचा बदल न झाल्याने अनेकांनी मत व्यक्त केले.बहूजन हिताय बहुजन सुखाय हे घोषवाक्य घेवून एस टी प्रवास करत आहे, मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे, त्यामुळे बसस्थानक मधील सेवकांनी प्रवाशांनी बोलताना भान राखणे गरजेचे आहे असे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!