चिपळूण तालुक्यातील चिवेली उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा




चिपळूण तालुक्यातील आदर्श शाळा चिवेली उर्दू शाळेत १५ ऑगस्ट २०२६ स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी ठीक ८.०० वाजता चिवेली उर्दू शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जनाब मुजफ़्फ़र दिवेकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर राष्ट्रगीत, झेंडा गीत व राज्य गीत गायन झाले. मुख्याध्यापक खान सर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या मुख्य हॉल मध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात शकील मौलाना यांच्या कुरआण पठणाने करण्यात आली. इ. १ ते ३ री च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट रित्ये नाअत सादर केली. शिक्षक श्री मुजाहिद मेअर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले व आपल्या प्रास्ताविकात मागील एक वर्षात ज्या देणगीदारांनी दोन लाख रुपयाची वस्तू स्वरूपात देणग्या दिल्या त्यांची नावे वाचून त्यांचे आभार प्रकट केले. व मागील वर्षभरामध्ये शालेय व शाळाबाह्य स्पर्धेत मुलांनी संपादन केलेल्या यशाचा उल्लेख केला. त्यानंतर देणगीदार जनाब वसीम गोलंदाज यांनी शाळेला नवीन दिलेल्या ऑफिस कपाटाचे उद्घाटन जनाब हशमत महालदार यांच्या हस्ते करण्यात आले. लहान गटातील विद्यार्थ्यांनी इंग्रजीमध्ये उत्तम भाषणे केली. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन देशभक्ति गीत, इंग्रजी व उर्दू नाटिका, व शेवटी सिल्याबस क्विज कॉन्टेस्ट घेण्यात आला. यामध्ये मुलांनी आपल्या टॅलेन्टचे प्रदर्शन करून केले. पाहुण्यातर्फे हशमत महालदार, जनाब जहीर चौगले, शाळा मुख्याध्यापक श्री खान सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुजफ्फर दिवेकर यांनी आपल्या मनोगतामध्ये कार्यक्रमाचे बद्दल शाळेतील शिक्षक व मुलांची भरपूर प्रशंसा केली.
त्यानंतर चित्रकला स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, व क्वीझ कॉन्टेस्ट मध्ये क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा मेडल्स, भेटवस्तू व ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी इ. ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये यश प्राप्त कु. आयशा जहीर चौगले व नबा नासिर चौगले त्याचप्रमाणे इ. ५ वी शिष्यवृत्ती यश प्राप्त खदीजा जहीर चौगले यांचा ही पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. इतर स्पर्धा निकाल खालील प्रमाणे.
चित्रकला स्पर्धा (इ. १ ते ३ री गट)
प्रथम – हादिया मुस्तकीम महालदार, दुसरा – हफसा मुसाकीम महालदार, तिसरा – अलिजा ऐजाज परकार, चौथा क्रमांक – अलीजा अमजद घारे.
चित्रकला स्पर्धा (इ. ४ थी ते ७ वी गट)
प्रथम – सहारा गफफार महालदार, दुसरा – नूहा रिझवान खान, तिसरा – खदीजा जहीर चौगले, चौथा – आमिना ऐजाज परकार.
उर्दू निबंध लेखन स्पर्धा (इ. ४ थी ते ७ वी)
प्रथम क्रमांक – मुस्कान अमजद घारे, दुसरा – सहारा गफफार महालदार, तिसरा – खदीजा जहीर चौगले, चौथा क्रमांक – आयमा अ. शेख.
कुईज कॉन्टेस्ट (इ. ४ थी ते ७ वी)
प्रथम क्रमांक – खदीजा जहीर चौगले.
दुसरा क्रमांक – आयशा जहीर चौगले.
तीसरा क्रमांक – आयमा अब्दुल्ला शेख.
चौथा क्रमांक – सफा गफफार महालदार.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मुजाहिद मेयर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक हसन अलि हुसैन अली खान सर, मेयर सर, शिक्षिका परवीन गडकरी मॅडम, सौ आयशा महालदार मॅडम, यांनी विशेष मेहनत घेतली.
पालक व ग्रामस्थ यांच्या तर्फे मुलांना रोख रक्कम, चॉकलेट व जिलेबी वाटप करण्यात आली. कार्यक्रमामध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री मुजफ्फर दिवेकर, श्री लायक साबळे, श्री साबिर अलि चौगले, श्री सिराज तांबे, मकबूल दिवेकर, रफिक महालदार, हशमत महालदार, समी महालदार, मौलाना जहीर चौगले, आदिल महालदार, असद खान, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.




