Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

नॅशनल हायस्कूल हर्णै मध्ये इको क्लब अंतर्गत वन्यजीव जनजागृती अभियान उत्साहात

प्रतिनिधी – मुबीन बामणे
हर्णै. दि. 24 ऑगस्ट 2026 – वन परिक्षेत्र कार्यालय दापोली आणि वाईल्ड अनिमल रेस्क्यूअर दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने SNAKE AWARENESS & MANGROVE PLANTS AWARENESS PROGRAM या वन्यजीव जनजागृती अभियानाचे आयोजन दि हर्णै एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल हर्णै व ह्युज ज्युनिअर कॉलेज हर्णै मध्ये आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमास वनरक्षक *प्रभू साबणे* वनाधिकारी मॅंग्रोव्ह *सोनाली हसे*, वाईल्ड अनिमल रेस्क्यूअर अध्यक्ष *मिलिंद गोरीवले*, स्नेक रेस्क्यूअर *प्रितम साठविलकर* व *सौ. साठविलकर* सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष *सना काजी* उपाध्यक्ष *सारिका पवार* कांदळवन समिती हर्णैचे अध्यक्ष *फहद जमादार* तसेच सामाजिक कार्यकर्ते *मुजामिल काजी* यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात *मिलिंद गोरीवले* यांनी विद्यार्थ्यांना सापांच्या विविध जाती विषारी व बिनविषारी साप याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रोजेक्टरच्या माध्यमातून विविध सापांच्या प्रजातींची छायाचित्रे व माहिती दाखवून, साप कसे ओळखावेत सापा बाबत गैरसमज दूर करणे आणि वन्य जीवनाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवणे याविषयी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करण्यात आले.
या जनजागृती कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना साप व इतर वन्यजीवना विषयी शास्त्रीय माहिती मिळाली. तसेच वन्य जीवनाचे संवर्धन, पर्यावरणाचे संवर्धन आणि कांदळवनाचे महत्त्व याबाबत ही जागरूकता निर्माण झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशालेचे जेष्ठ शिक्षक *मुबीन बामणे सर* यांनी मानले . कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक व उपस्थित मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वन्यजिवा विषयी भीती न बळकता त्यांच्याबद्दल योग्य माहिती घेऊन मानव वन्यजीव सह अस्तित्वाचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी विज्ञान वर्धक व प्रेरणादायी ठरला….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!