दापोलीच्या उद्यानविद्या महाविद्यालयातील ‘हरितसंगिनी’ गटातर्फे कोळथरे येथे उद्यानविद्या दिन साजरा

(दापोली- प्रतिनिधी: सागर गोवळे)
कोळथरे उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली येथील ‘हरितसंगिनी’ विद्यार्थी गटाच्या वतीने आई आनंदी गोपाळ महाजन माध्यमिक शाळा, कोळथरे येथे ‘उद्यानविद्या दिन’ मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला. या निमित्ताने रानभाज्यांचे प्रदर्शन आणि फळांवरील कलाकुसर (फ्रूट कार्व्हिंग) अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी पुष्पगुच्छ बनवणे आणि फ्रूट कार्व्हिंग स्पर्धा घेण्यात आली. तसेच गावातील महिलांसाठी रानभाज्यांपासून विविध चवदार पदार्थ तयार करण्याची पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही स्पर्धांना विद्यार्थी व ग्रामस्थ महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन
या कार्यक्रमास दापोली उद्यानविद्या महाविद्यालयाचे डॉ. पी. सी. माळी, डॉ. प्रविण झगडे व डॉ. विशाल केळसकर, तसेच शाळेचे उपाध्यक्ष श्री. गजानन बडे, मुख्याध्यापक श्री. मंगेश नरवणकर, सचिव श्री. रमेश कनगुटकर, प्रगतशील शेतकरी श्री. सुनील पेठे आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. माळी आणि डॉ. झगडे यांनी स्पर्धांचे परीक्षण करून विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले व विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
विद्यार्थिनींचे नियोजन व शिक्षकांचे मार्गदर्शन
या संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी आयोजन ‘हरितसंगिनी’ गटातील धनश्री चौगुले, श्रावणी कालेकर, साक्षी वालपकर, श्रद्धा कोतवाल, विशाखा आंबवले, यशिका करकेरा, अनया वराडकर, सानिका नाकील, अनुजा साळुंखे, सिद्धी धनावडे, सानिया पासिलकर, दिया म्हादये, सृष्टी पुरी आणि श्रावणी आरेकर या विद्यार्थिनींनी केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. डी. शिर्के, विषयतज्ज्ञ डॉ. समीर काळे, तसेच मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. नितेश दळवी, डॉ. थोरात, डॉ. शिगवण, डॉ. राऊत, डॉ. दोसाणी, डॉ. तोरणे आणि डॉ. गुढदे यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.




