कुटगिरी (गावठाणवाडी) लोखंडी पूल दुर्घनेनंतर प्रशासनाची धाव : उपसभापती निलेश सुर्वे यांनी केली घटनास्थळी पाहणी

शृंगारतळी (मयुरेश भागवत )-गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावठाणवाडी येथील नदीवरील लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहाणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांनी दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली तसेच बाधितांना दिलासा दिला. सुमारे 25ते30वर्षापुर्वी उभारण्यात आलेला हा लोखंडी पुल अचानक कोसळल्याने कुटगिरी व कोतळूक गावामधील संपर्क तुटला या दुर्घटनेत 10ते 12गुरे जखमी झाली असुन एका बैलाचा मृत्यू झाला. सुदैवाने कोणतीही मानवी जिवीतहानी झाली नाही .या वेळी बोलताना उपसभापती निलेश सुर्वे म्हणाले की या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांच्यासह पालकमंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री जयकुमार गारे, यांच्याकडे तातडीने पाठपुरावा करून नवीन लोखंडी पुल मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या दुर्घटनेत जखमी झालेल्या गुरांसह गाभण गाईवर त्वरित उपचार करण्याच्या सुचना पशु संवर्धन विभागाला देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
या पाहाणी वेळी पंचायत समिती सदस्या स्नेहा शिगवण, चारुदत्ता सावंत, मनोहर खेतले सोसायटीचे चेअरमन कृष्णा सोलकर, नामदेव खेतले, प्रकाश वीर, ग्रामसेविका प्राजक्ता पाटील, विनय कातळकर आदी उपस्थित होते.




