अजीजा दाऊद नाईक हायस्कूलमध्ये रस्ता सुरक्षा आणि वाहतूक जनजागृती मोहीम संपन्न
रत्नागिरी प्रतिनिधी-शकील गवाणकर
जिल्हा वाहतूक शाखा रत्नागिरी आणि अजीजा दाऊद नाईक हायस्कूल, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘रस्ता सुरक्षा व वाहतूक जनजागृती’ या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम आणि सुरक्षिततेचे महत्त्व कडावे, या उद्देशाने या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा वाहतूक शाखेचे हेड कॉन्स्टेबल श्री. सुशांत पवार यांनी सकाळी १०:३० ते १२:३० या वेळेत दोन स्वतंत्र सत्रांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे व प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम, जबाबदार नागरिकत्व आणि महिला सबलीकरण या विविध पैलूवर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात नियमांचे पालन कसे करावे, हे त्यांनी पटवून दिले.
हा महत्त्वाचा कार्यक्रम अजीजा दाऊद नाईक हायस्कूलचे ज्येष्ठ सहाय्यक शिक्षक श्री. मुझ्क्कीर खतीब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. मैनुद्दीन भैरवाडी यांनी केले. शाळेचे माजी विद्यार्थी श्री. आदिल माजगावकर यांनी हे जनजागृती सत्र आयोजित करण्यात मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. समीर गडबडे यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल हेड कॉन्स्टेबल श्री. सुशांत पवार यांचे आभार मानले. तसेच श्री. आदिल माजगावकर, श्री. मुझ्क्कीर खतीब, श्री. मैनुद्दीन भैरवाडी आणि हा स्तुत्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले.




