महाराष्ट्र

​ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE), बोरजच्या गुणवंताचा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सत्कार!

खेड : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) संचालित, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE), बोरज (प्राथमिक विभाग) येथील इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्याचा महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री नामदार श्री. दादाजी भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

​राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या वतीने ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शालेय शिक्षणमंत्री श्री. दादाजी भुसे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

​या परीक्षेत ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE) चा विद्यार्थी कु. कृपाल प्रविण कांबळे याने २९८ पैकी २६४ गुण मिळवून राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला असून राज्यात ११ वा क्रमांक मिळवला आहे. त्याचा महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना. श्री. दादाजी भुसे व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्याने मिळवलेल्या या यशामुळे प्रशासलेच्या शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीत मानाचा तुरा रोवला गेला आहे.

​या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस श्री. माधव पेठे, खजिनदार श्री. विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी श्री. दीपक लढा, विश्वस्त श्री. पेराज जोयसर व श्री. भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस श्री. प्रकाश गुजराती, संस्थापक सदस्य श्री. चंदन पाटणे, श्री. प्रफुल्ल महाजन व श्री. अनिल शिवदे, संस्था सदस्य सौ. रुपल पाटणे, सल्लागार मंडळाचे सदस्य तसेच ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!