महाराष्ट्र
माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी चिपळुणात पुष्पांजली कार्यक्रम

चिपळूण – महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत अध्यक्ष स्व. अजित दादा पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्ताने बुधवार दिनांक २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण समोरील पटांगणात पुष्पांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन उर्फ अबू ठसाळे व चिपळूण शहराध्यक्ष मिलींद कापडी यांनी केले आहे.




