Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये पाटपन्हाळे महाविद्यालयातील विद्यार्थांची यशस्वी वाटचाल

प्रतिनिधी (मंगेश जाधव)
मुंबई वि‌द्यापीठाने आयोजित केलेल्या ५९ व्या सांस्कृतिक युवा महोत्सव २०२६-२७ च्या उत्तर रत्नागिरी झोन ०९ ची प्राथमिक फेरी घरडा इन्स्टिट्यूटक ऑफ टेक्नॉलॉजी लवेल, ता. खेड, जि. रत्नागिरी येथे संपन्न झाली. उत्तर रत्नागिरी झोन ०९ विभागातून एकूण २१ महावि‌द्यालयांनी विविध कालाप्रकारामध्ये सहभाग नोंदविला. पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महावि‌द्यालयाने सदर युवा मोहत्सवामध्ये एकूण १० विविध कलाप्रकारात सहभाग नोंदविला. यापैकी कथाकथन स्पर्धा गट अ मध्ये कु. नेत्रा प्रसाद पाध्ये – तृतीय वर्ष वाणिज्य, हीने ‌द्वितीय क्रमांक पटकाविला. भारतीय समूह गीतगायन स्पर्धेत महावि‌द्यालयाला तृतीय क्रमांक मिळाला यामध्ये कु. साक्षी पवार – तृतीय वर्ष वाणिज्य, कु. मिताली शिगवण – द्वीतीय वर्ष वाणिज्य, कु. सदिच्छा कदम – प्रथम वर्ष वाणिज्य, कु. आदिती देवळे – प्रथम वर्ष वाणिज्य, कु. रिया घाणेकर – प्रथम वर्ष वाणिज्य आणि कु. सुदीक्षा भागडे ‌- द्वितीय वर्ष कला या वि‌द्यार्थिनी सहभाग घेतला. यावेळी स्कीट गट सी (हिंदी) या स्पर्धेत महावि‌द्यालयास उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. स्कीट मध्ये कु. समृद्धी घाणेकर – तृतीय वर्ष वाणिज्य, कु. मिताली शिगवण – द्वीतीय वर्ष वाणिज्य, कु. श्वेता निंबरे – द्वीतीय वर्ष वाणिज्य, कु. साक्षी पारदळे – द्वीतीय वर्ष वाणिज्य, कु. विकेशा सकपाळ – प्रथम वर्ष वाणिज्य, कु. अनघा सुरळकर – प्रथम वर्ष वाणिज्य या वि‌द्यार्थीनी सहभाग घेतला.

वरील स्पर्धेत यश संपादन करण्याऱ्या सर्व वि‌द्यार्थांची मुंबई वि‌द्यापीठ मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रवीण सनये, प्रा. सौम्या चौघुले, प्रा. कांचन कदम, रत्नागिरी येथील कोरिओग्राफ़र मा. श्री. अक्षय पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

वि‌द्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाची व सांस्कृतिक विभागाच्या कार्याची दखल घेत पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक पदाधिकारी आणि महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी यशस्वी विद्यार्थांचे व सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच महावि‌द्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि महावि‌द्यालयीन वि‌द्यार्थी यांनी सर्व यशस्वी वि‌द्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!