Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन पनवेल शहरात साजरा

(प्रतिनिधी- मंगेश जाधव )
पनवेल शहरात जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी बांधव यांनी पारंपारिक पद्धतीने वेशभूषा केली होती. या कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी विकास परिषद आणि अन्याय अत्याचार निर्मूलन समिती यांनी संयुक्तपणे गोखले सभागृहात आयोजित केले. या कार्यक्रमात माची प्रबळ येथील ४ आदिवासी बांधव यांनी भटकंती करताना अडकलेले २३ जणांची पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने सुटका केली म्हणून त्यांचे गौरव करून सत्कार करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विक्रांत पाटील, ऐड. मदन गोवारी, डॉ. सुनील शिरीषकर ( प्रहार संघटना), नगरसेवक शशिकांत शेळके अण्णा पंडित ( जेष्ठ समाजसेवक) , सुभाष गायकवाड ( भीमशक्ती संघटना) , जेष्ठ पत्रकार निलेश सोनवणे, स्वतंत्र पत्रकार संघाचे माऊली शेलार, बी पी लांडगे, संतोष चालके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार विक्रात पाटील यांनी आदिवासी विकासासाठी सर्व आवश्यक मदत करण्याची आश्वासन दिले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला पदाधिकारी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!