पांगरी हवेली सडेवाडी भुरुकुंडा रस्ता अतिक्रमण प्रकरणी प्रशासनाच्या तारीख पे तारीख धोरणाला कंटाळून ग्रामस्थांनी घेतला 15आँगस्ट 2026पासून बेमुदत उपोषणाचा इशारा

प्रतिनिधी (मंगेश जाधव )-गुहागर तालुक्यातील पांगरी तर्फे हवेली येथील ग्रामस्थांनी रस्ता अतिक्रमणाच्या व न्यायाच्या मागणीसाठी 15आँगस्ट 2026पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. अनेक वर्षापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार पांगरी तर्फे हवेली येथील सडेवाडी भुरुकुंडा हा ग्रामीण मार्ग सन 2009ते 2010या कालावधीत ग्रामनिधीतुन जमीन मालकांची संमती घेऊन तयार करण्यात आला होता. त्यानंतर सन 2016-17मध्ये या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे पाच लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता.मात्र संबंधित रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने तो रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खोदून टाकण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.त्यामुळे ग्रामस्थाची मोठी गैरसोय होत असुन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर झालेला सुमारे दहा लाखाचा निधीही परत गेल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे या प्रकरणी गेली दोन वर्षे प्रशासनाकडे अर्ज विनंत्या व पुरावे सादर करूनही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे न्याय मिळावा आणि संबंधित रस्ता पूर्ववत खुला करण्यात यावा या प्रमुख मागण्यासाठी 15आँगस्ट 2026रोजी सकाळी 8वाजल्यापासून तहसीलदार कार्यालया समोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे केले आहे.




