Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचार मंच व जिजाऊ ब्रिगेड तर्फे शुभंकरोती वाचनालयाला पुस्तके भेट

चिपळूण – बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे कार्यरत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचार मंच व मा जिजाऊ यांच्या नावे कार्यरत असणाऱ्या जिजाऊ ब्रिगेड चिपळूण तर्फे सती येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या वाचनालयाला स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १०,०००/- किमतीची पुस्तके भेट दिली.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शुभंकरोती सती, चिपळूण येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचार मंच चे अध्यक्ष शिवश्री मुजफ्फर भाई सय्यद , तसेच जिजाऊ ब्रिगेड चिपळूण तालुका अध्यक्षा शिवमती मिनल गुरव यांनी वाचनालयाच्या चळवळीला हात भार लावण्याकरिता १०,०००/- रु ची पुस्तके भेट दिली. महाराष्ट्रातल्या अनेल नामवंत कवी, लेखकांची पुस्तके तसेच प्रबोधनामक विचाराची पुस्तके या कार्यक्रमात शुभंकरोती पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. अरविंद पोतदार यांना देण्यात आली. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचार मंच चे उपाध्यक्ष शिवश्री दिनेशजी माटे, जिजाऊ ब्रिगेड च्या तालुका अध्यक्षा मीनल गुरव, कवियत्री जयश्री यादव, ग्राहक मंच चे मानसिंग यादव, संभाजी ब्रिगेड चे शिवश्री टी. डी. पवार तर शुभंकरोती पतसंस्था व वाचनालयाचे श्री नझारे , श्रीमती अपर्णा गुजर, श्री संजय इंदुलकर, श्री अविनाश बामणे , श्री रवींद्र शिंदे, श्री मंगेश सागवेकर, श्री संतोष मादगे , श्री सूचित सावंत आदि उपस्थित होते. शुभंकरोती चे अध्यक्ष डॉ. अरविंद पोतदार यांनी उपस्थितांचे स्वागत व मंच चे व ब्रिगेड चे स्तुती देणगी बाबत आभार मानले, या प्रसंगी कवियत्री जयश्री यांनी आजच्या वास्तवावर प्रकाश टाकणारी कविता सादर केली, तर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कवी, लेखक्, विचारवंत, व्याख्याते, शिवश्री मुजफ्फरभाई सय्यद यांनी एकतेचा संदेश देणारी त्यांची ‘संदेश’ कविता सादर केली, उपस्थितांना भारावून टाकले.
जिजाऊ ब्रिगेड च्या तालुका अध्यक्षा मीनल गुरव यांनी व टी. डी. पवार यांनी ही या प्रसंगी आपले विचार व्यक्त करून देशात एकता, अखंडता, बंधुता नांदावी यासाठी उपस्थितांना आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!