Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेत सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा सावर्डेचे दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले

रत्नागिरी प्रतिनिधी- शकील गवाणकर
सावर्डे :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेत सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा सावर्डेचे दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
श्लोक सूरज शिंदे हा विद्यार्थी 270 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत रत्नागिरी जिल्ह्यात चौथा व चिपळूण तालुक्यात दुसरा आला आहे. तर मिन्सा अबुबकर तांबे ही विद्यार्थिनी 252 गुण मिळवून ग्रामीण सर्वसाधारण विभागात पहिली व जिल्ह्यात बारावी आली आहे.
चिपळूणचे आमदार, सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शेखर निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, उपाध्यक्ष युगंधरा राजेशिर्के, प्रशांत निकम, डॉ. इसहाक खतीब, शांताराम खानविलकर, चंद्रकांत सुर्वे, मानसिंग महाडीक, मारुतीराव घाग, गुलाब सुर्वे, हरिश्चंद्र सुर्वे, महेश महाडीक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या विद्यार्थ्यांना शकील मोडक, रसिका सुर्वे, प्रणित राजेशिर्के, श्रुती कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!